जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पर्यंत किती केली

मोदींची भाषणे हे नागरिकांना आता नवे नसले तरी त्यांनी आता पर्यंत नेमकी किती भाषणे केली हा संवशोधनाचा विषय ठरण्यास हरकत नाही "इकॉनॉमिक टाइम्स' वृत्तपत्राने याचा खरोखरीच शोध घेतला आणि मोदी हे महिन्याला सरासरी 19 भाषणे देत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातुलनेत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची दर महिन्याला भाषणाची सरासरी ही 11 च येत आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 41 महिन्यात तब्बल 775 जाहीर भाषणं केली आहेत. प्रत्येक महिन्याला मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच दर तीन दिवसांपैकी दोन दिवस त्यांनी जाहीर सभांमधून भाषण केल्याचं म्हणू शकतो. बहुतेक भाषणं ही किमान 30 मिनिटांची होती.

त्याउलट मनमोहनसिंग यांनी 10 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत 1 हजार 401 भाषणे दिली. म्हणजेच महिन्याला सरासरी 11 भाषणे दिली. पण अवघ्या तीन वर्षात मोदींनी भाषणबाजीत मनमोहनसिंग यांना मागे टाकले आहे. लाल किल्यावरून स्वातंत्र्यदिनी लांबलचक भाषण केल्याचा विक्रमही मोदी यांच्या नावावर आहे.

मोदींच्या सभा..!

सप्टेंबर 2014 मध्ये एका महिन्यात मोदींची 31 भाषणे
एप्रिल 2015 मध्ये मोदींच्या 32 जाहीर सभा
2015 मध्ये मोदींची जाहीर सभांमध्ये 264 भाषणे
नोव्हेंबर 2015 या एकाच महिन्यात मोदींची 36 भाषणे
बिहार निवडणुकीसाठी घेतलेल्या 4 सभांचाही समावेश

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews